Threshold Determined from Birth | जन्मापासून ठरलेला उंबरठा

Threshold Determined from Birth | जन्मापासून ठरलेला उंबरठा

Threshold Determined from Birth


मध्यमवर्गीय घरात जिथे आई, मुलगा, बायको असं त्रिकोणी कुटुंब राहत होत, त्या त्रिकोणी कुटुंबाचा चौकोन करण्यासाठी एक नवजात शिशु जन्माला येणार ही गोड बातमी कळताच मुलाची आई अश्रू ओघळत आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे एकटक पाहत होती.

मुलाचे नाव: प्रवीण. प्रवीणने आईला म्हणजेच संगीता ताईंना भरलेल्या डोळ्यांचे कारण विचारले तेव्हा आईने जे उत्तर दिले तिथे एक क्षण कथानायक म्हणून माझेही डोळे पाणावले.

संगीताताई प्रवीणला सांगत होत्या की, जेव्हा लग्न होऊन मी या घरात पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा तुझी जुनाट विचारांची आजी पहिल्याच दिवसापासून रोकटोक करायला लागली होती. 

घरची नवीन सून आहेस चारचौघात पदर डोक्यावर घ्यायचा, घरातले बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही, शेजारी पाजारी माणसं जोडायची नाही ती कुटुंबाला नजर लावतात अशी सर्व बंधने मला लागली. पण ह्यांची खंबीर साथ होती म्हणून मी निभावून घेतलं.

कोवळं वय होत माझं, संसार म्हणजे नक्की काय हे मला काहीच माहित नव्हतं. पण ह्यांच्या मदतीने मी हळू हळू ते शिकत राहिले.

नशिबाची थोडी साथ लाभली आणि तुझ्या आजीला देवाज्ञा झाली. असं वाईट कोणाबद्दल बोलू नये पण आता कुठे सुटकेचा श्वास घेईन म्हंटल तर आई गेल्याच्या धक्क्याने ह्यांनी जणू अंथरुणंच धरलं आणि सगळी घरची जबाबदारी अचानक माझ्यावर आली. 

त्यात ६ महिन्यांची गरोदर आणि तू पोटात. आता काय करावे सुचत नव्हते बहिणीला बोलवावी तर ती पण लहान आणि माझी आई अगोदरच वारली होती. 

ह्यांच्या बँक खात्यात थोडे फार पैसे होते त्यातून सहा एक महिन्यांचा उदरनिर्वाह कसा बसा पार पडला. तेव्हा मला पैश्यांचे महत्व आणि गरज दोन्ही समजू लागले.

शेजारी एक ताई शिवणकाम करायच्या त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता आणि त्यांना मदतीला आणखी गरज होती, मग मी निर्णय घेतला, तू कोवळा बाळ हाताशी आणि घराच्या अगदी जवळ कामाचे ठिकाण. 

मग त्यांना विचारणा केली आणि महिना अडीच हजार रुपये प्रमाणे काम मिळवलं. सुरुवातीला खूप चुका झाल्या पण त्यांनी सावरून घेतल्या, आणि अश्या प्रकारे आमच्या दोघांचा संसार सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते.

देवाच्या सुदैवाने ह्यांची तब्येत हळू हळू सुधारत गेली आणि दोन वर्षाच्या अवधीनंतर पुन्हा हे कामावर जाऊ लागले. हळूहळू सर्व सुधारत होते ती सुखाची देखणी वेळ कधी निसटून गेली समजलेच नाही. 

तू दहावीत असतानाची ती संध्याकाळ. तुलाही आठवत असेलच. तो पोलीस चौकीतून आलेली तुझ्या वडिलांची अपघाती निधनाची बातमी आणि पुन्हा सगळं विस्कटलं.

तुझ्या वडिलांची गेल्याची बातमी समजताच पुन्हा तोच भूतकाळ डोळ्यासमोर आला, तेच वास्तव पुन्हा जगावे लागणार होते आणि आता मनाची तेवढी तयारी नव्हती पण पुरुषाचा जसा जन्म कष्टाचा असतो तसाच स्त्री जन्म हा वेदनांचा असतो ही शिकवण मला आयुष्याने २ वेळा शिकवली. 

पुन्हा मन खंबीर केलं आणि कलेला मरण नसत ह्या ब्रिदवाक्याला स्मरून परत शिवणकाम सुरु केलं, पण ह्यावेळेला स्वतःच अस्तित्व घडवायचं होत. 

त्यामुळे स्वतःची ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत आपलं हक्काचं गारमेंट उभं केलं. सुरुवातीला व्यवहार ज्ञान कमी होत पण ओळखीने आणि असंख्य चुकांनी खूप काही शिकवलं आणि आज आपण इथे आहोत. 

एक ती संध्याकाळ आहे जिथे तुझ्या जन्माच्या वेळी सोबत कोणी नव्हतं, बाप होता पण आजारपणात होता आणि एक हा दिवस आहे जिथे तुझ्या बायकोच्या उदरात नवजात जीव श्वास घेत आहे. पण आज त्याची किंवा तिची ही आजी स्वागतासाठी खंबीर उभी आहे.

या कथेमध्ये पुरुषाने शिकण्यासारखे म्हणजे स्त्रीची निर्णय क्षमता जर योग्य असेल आणि जिद्द हट्टाला पेटली ना तर स्त्री असे असंख्य अडचणींचे उंबरठे सहज पार करू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने